धारणीतील रोजगारसेवक धडकले उपविभागीय कार्यालयात...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी तालुक्यातील रोजगार सेवक संघटना विविध मागण्या घेऊन उपविभागीय अधीकारी कार्यालयात निवेदन घेऊन धडकले. व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्य्क जिल्हाधिकारी श्री. वैभव वाघमारे यांना भेटून निवेदन दिले.रोजगार सेवक संघटना सेवकांच्या विविध प्रलंबित  मागण्यासाठी वेळीवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. शासनाने 2 मे 2011 चा अर्धवेळ चा शासन शासन निर्णय रद्द करावा व रोजगार सेवकांना पूर्णवेळ सहायक सचिवाचा दर्जा देण्यात यावा, तसेच प्रवास व अल्प उपहार भत्ता नियमित देण्यात यावा. व मेळघाट मध्ये मोठ्या प्रमाणात कामे होत असल्याने त्याचा पूर्ण तान रोजगार सेवकावर येतो.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही संपूर्ण योजना रोजगार सेवकांवर अवलंबून असल्याने रॊजगार सेवक महत्वाचा घटक आहे. परंतु त्याला टक्केवारीवर ठेऊन ते ही वेळेवर मिळत नसल्याने. रोजगार सेवकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे म्हणून नियमित मानधन,नियमित प्रवासभत्ता, अल्पउपहार भत्ता देण्यात यावे.अश्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले.

Previous Post Next Post