वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे तज्ञांनी वर्तवलेल्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या मदतीने ग्रामिण भागातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सीजन प्रणाली कार्यन्वीत केल्याने आता ग्रामिण भागातही कोरोना रूग्णांवर उपचार होणार आहे. कोरोना विषाणुची दुसरी लाट ओसरली असली तरी तीसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. या दृष्टीकोनातून शासनस्तरावर उपाय योजना सुरू आहेत. दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सीजन बेड उपलब्ध नसल्याने उपचार झाले नाहीत. तसेच ग्रामिण भागात ऑक्सीजन अभावी उपचार होवू शकले नाही. याकरीता शासनाच्या वतीने ग्रामिण भागावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. याकरीता गटवकिास अधिकारी विलास भाटकर यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी.डी.धाडी, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, यांच्या माध्यमातून ऑक्सीजन प्रणाली बसविण्याकरिता निधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते या निधीअंतर्गत कठोरा व पिंपळगाव बुद्रुक येथे बसवण्यात आल्या ऑक्सिजन प्रणालीचे आज लोकार्पण गटविकास अधिकारी विलास भाटकर गटशिक्षणाधिकारी बि डी धाडी शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान पंचायत समिती कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र फेगडे, वैद्यकीय अधिकारी राजु तडवी, नितीन सोनवणे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी.आर.चौधरी, एस.डी.भिरूड, भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, शिक्षक परिषदेचे एस.एस.अहिरे, माध्यमिक पतपेढीचे संचालक डॉ. संजू भटकर, विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनिल वानखेडे प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष गजानन नारखेडे,पिंपळगाव बुद्रुक सरपंच ज्ञानदेव मावळे, ग्रामसेवक आर.एस.बोदडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.दोन लाख चाळीस हजाराचा जमा झाला निधी.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंचायत समिती व शिक्षण विभागाने शिक्षक संघटनाना आवाहन केले. यावेळी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शंभर टक्के तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सत्तर टक्के शिक्षकांनी मदत केल्याने दोन लाख चाळीस हजाराची मदत जमा झाली. या मदतीतून कठोरा ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ तर पिंपळगाव बुद्रुक येथे ८ ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आल्याने आता ग्रामिण भागात देखील कोरोना रूग्णांवर उपचार होणे शक्य आहे.
शिक्षकांच्या एकी मुळे शक्य झाले
मागील काळाचा अनुभव बघता शहरातील ऑक्सीजन बेड असलेल्या रूग्णालयांमधे मोठा भार पडला होता. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी सामाजीक संघटनाना आवाहन करून ग्रामीण भागात ऑक्सीजन प्रणाली बसविण्याचे आवाहन केले होते. यानुसार तालुक्यातील सर्वच शिक्षक संघटना व शिक्षकांना आवाहन करण्यात आले होते. सर्वांनी मदत केल्याने हि ऑक्सीजन प्रणाली कार्यन्वीत करता आली
विलास भाटकर
गटविकास अधिकारी