विठाई बसच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना थांबावा...!!!


 नांदुरा तालुका प्रतिनिधी:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून डिसेंबर २०१८ मध्ये पंढरपूरला भाविकांसाठी विठाई बस सेवा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विठू माऊलीच्या सर्वच भक्तांना या निर्णयाचा आनंद झाला. सध्या विठ्ठल भक्तीचा आषाढी मासाच्या निमित्ताने अनेक प्रवासी आणि वारकरी या बसने प्रवास करीत असतात. तरी या बस संदर्भात आमची एक विठ्ठल भक्त म्हणून आपल्याकडे एक नम्र निवेदन आहे की विठू माऊलीचे चित्र बसच्या बाहेरील पृष्ठभागावर न लावता आतील बाजूस लावावे.विठू माऊली चे चित्र बसच्या बाहेरच्या बाजूस रेखाटलेले असल्यामुळे विठू माऊलीच्या चित्रावर खूप धूळ बसते त्यामुळे बसची स्वच्छता होईपर्यंत विठुराया वर धूळ तशीच राहते. प्रवाशांचे खिडकीतून बाहेर थुंकणे,चूळ भरणे,तोंड धुणे, उलटी करणे यामुळे बसच्या बाहेरील बाजूस असलेल्या विठू माऊलीच्या चित्रावर त्याचे शितोडे उडतात. बसमधील प्रवासी जाणीवपूर्वक विटंबना करत नाहीत. तरीही एक प्रकारे श्रीविठ्ठलाच्या चित्राचा अनावधनाने झालेला का होईना हा अनादरच आहे. तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेकदा रस्त्यावरील चिखल विठुरायाच्या चित्रावर उडतो. भक्तिभावाने आपण ज्या विठ्ठलाची पूजा करतो, त्याला घाणीने माखलेले बघणे हे खूप वेदनादाई आहे. जेथे श्री विठ्ठलाचे चित्र आहे तेथे साक्षात आपली विठू माऊली असते असा वारकऱ्यांचा भाव आहे.त्यामुळे दिनांक २८ जुलै २०२१ वार बुधवार रोजी श्री.राहुल तायडे तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नांदुरा, यांना हिंदू जनजागृती समितीचे श्री जितू मोरे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन अशी मागणी करण्यात आली की, *"विठाई"* बस च्या बाहेर असलेल्या श्रीविठ्ठलाच्या चित्रांची विटंबना तात्काळ रोखावी.श्री विठुरायाचे चित्र बसच्या बाहेरच्या बाजूस लावण्यापेक्षा बस च्या आतील बाजूस लावावे. प्रतिदिन त्या चित्राचे पूजन होऊन त्याचे पावित्र्य राखले जाईल असे पहावे. शासन या निवेदनाची त्वरित दखल घेईल आणि आवश्यक ती कार्यवाही करेल अशी आम्ही सर्व हिंदू धर्मप्रेमी आशा बाळगतो.यावेळी भगव वादळ ग्रुपचे संस्थापक अनिल जांगळे,भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. सारीका राजेश डागा,बजरंग दलचे तानाजी वनारे,शिवरुद्रा सेनेचे शुभराज डंबेलकर,श्रीराम सेनेचे वैभव कापडे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक विशाल बग्गन,मंगेश इतखेडे,प्रकाश बावस्कर,संजय मात्रे,भागवत पेटकर,प्रशांत संभारे,आकाश वतपाळ,महेश उंबरकर,विशाल डागा,पवन जांगळे,सौ.लताताई किशोर ठोंबरे,संतोष वर्मा,शिवराज फणसे,निलेश राखोंडे,शिवा आमले,गणेश वसे,यश मांजरे,पवन वर्मा,आकाश भिवटे,तेजस भोपळे,उमेश हिंगणकर,राहुल एकडे व असंख्या हिंदू धर्म प्रेमी उपस्थित होते.

Previous Post Next Post