वाघांचे संरक्षण तसेच जंगलातील अतिक्रमण अवैध वृक्षतोड त्वरित थांबवा या मागणीसाठी आझाद हिंद संघटनेचे निवेदन...


 बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघांचे संरक्षण होण्यासाठी जंगलातील अतिक्रमण व अवैध वृक्षतोड त्वरित थांबविण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 29 जुलै रोजी आजाद हिंद संघटनेने उपवन संरक्षक कार्यालय बुलढाणा येथे जाऊन सदर बाबीचे निवेदन दिले. जंगलातील अतिक्रमण आणि अवैद्य वृक्षतोडीमुळे हिस्त्र वन्य प्राणी गावाकडे आणि शेताकडे वळत आहे.शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी शेतमजूरांवर प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे.तर वन्य प्राण्यांच्या मुक्तसंचाररामूळे शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकरी शेतमजूरांवर होणारे हिंस्त्र पशूंचे हल्ले रोखण्यासाठी अवैध जंगलतोड आणि अवैध अतिक्रमण  त्वरित थांबविण्यात यावे. सदर अवैध अतिक्रमण आणि अवैध जंगलतोड करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी यांचे संबंधितांसोबत आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलेला आहे.परंतु सदर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता अद्यापही वरिष्ठांकडून या संदर्भात कोणतेही चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. किंवा अशा कर्मचाऱ्यावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. सदर निवेदनावर आणि नमूद मागण्यांवर त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा वन विभाग कार्यालय समोर अतिक्रमण करून वस्ती उभारण्याचा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. सदर मागणी संदर्भात दिनांक 29 जुलै रोजी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदिर, शालेय पोषण आहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लियाकत खान,विदर्भ कार्यध्यक्ष एसजी खान, विदर्भ महासचिव अली खान, एडवोकेट करीमखान यांच्या नेतृत्वात विभागीय वन अधिकारी अक्षय गजभिये यांना दिनांक 29 जुलै रोजी निवेदन सादर केले आहे.हिस्त्र पशूंचा शहर व गावांमधील  मुक्त संचारामूळे शेतकरी शेतमजुर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतेच काल बुलडाणा शहरालगत मलकापूर रोडवरील माऊली हॉटेल समोर अस्वलाचा मुक्तसंचार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा ठरला. तर मलकापूर तालुक्यातील बेलाड, माकनेर परिसरात वाघासह रानटी डुकरांचा मुक्तसंचार,बोथा परिसरात नुकताच नागरिकांवर झालेला प्राणघातक हल्ला या सर्व घटनांची गांभीर्याने दखल घेत आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने आलेल्या तक्रारी व वर्तमानपत्रातील बातम्यांच्या अनुषंगाने सदर निवेदन सादर केलेले आहे.

Previous Post Next Post