मेळघाट मध्ये गावागावात रामरथाचे माध्यमातून जनजागृती...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

एकल अभियान परतवाडा मार्फत प्रत्येक गावात रामरथ चे आगमन होत आहे.मेळघाट मधील प्रत्येक गावात 330 ही गावात रामरथ पोहचणार असल्याचे एकल प्रमुख किशोर हेकडे यांनी सांगितले आहे.या रामरथामध्ये संपूर्ण रामदरबार आहे. अयोध्या वरून निघालेले हे रामरथ मेळघाट मधील प्रत्येक गावागावात जाऊन गावकर्यांना रामदरबारचे दर्शन होणार आहे. जणू भगवान श्रीराम स्वतः भक्तच्या भेटीला येत आहे. यासाठी मेळघाट मधील लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. श्रीराम दरबार व्यतिरिक्त या रथामध्ये प्रोजेक्टर च्या माध्यमाने कोरोना बाबत जनजागृती शिक्षण व आरोग्य, कुपोषण, व्यसनमुक्ती बाबत माहिती दिली जात आहे.तसेंच भारतीय सनातन संस्कृती मधील विविध धार्मिक कार्यक्रम दाखविले जात आहेत.

Previous Post Next Post