हिवरखेड पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टरांची गरज,सतत डॉक्टर गैर हजर राहत असल्याने पशुपालकांना हेलपाटे,


हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड आठवडी बाजारात असलेला पशुवेदकीय दवाखाना डॉक्टर नसल्याने निकामी दिसत आहे,  या अगोदर या दवाखान्यात काम्यस्वरूपी डॉक्टर कोरडे मनुन होतें ,परंतु काही कारणास्तव त्याची बदली झाली किंवा त्यांनी बदली केली त्यामुळे ते येथून स्थलांतर झाले ,तेव्हापासून इथं कायस्वरूपी डॉक्टर नाहीत, अधून मधून अडगाव बु येथील डॉक्टर येतात तर गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी सेवा देतात , कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने गावात व परिसरातील  पशुपाल्यांचे जनावरे आजारी झाले तर त्यांना बऱ्याचदा हिवरखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातुन परत जावे लागते, 

वेळेवर जनावरांना उपचार मिळत नसल्याने पशु प्रेमींना हेलपाटे सहन करावे लागत तर काहींची जनावरे दगावतात  आणि पशुपाल्याना  आवश्यकतेवेळी  खाजगी कामगीरी बजवावी लागते,   आठवडी बाजारातील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर द्या अशी मागणी गावातील पशू प्रेमी करीत आहेत.

हिवरखेड पशुपालकांचे  जनावरे आजारी झाल्यास  त्या जनावरांचा तात्काळ  उपचार व्हावा  या करिता वरिष्ठांनि येथे कायमस्वरूपी डॉक्टर द्यावा,

जीतेंश कारिया,

(पशुप्रेमी हिवरखेड,)

माझ्या गायचा वेळेवर उपचार झाला असता तर माझी गाय आज  जिवंत असती ,माझी पाळीव गाय काल रात्री  वेळेवर उपचार न झाल्यामुळे वारली,

जुबेर खा,

(पशुपाल्य हिवरखेड,)

Previous Post Next Post