राजु भास्करे /अमरावती जिल्हा
विदर्भाचे नंदणवण असलेल्या चिखलदरा येथे कोरोना मुळे गेले अनेक दिवस लाकडाऊन होते, तेंव्हा कोरोनाची तीव्रता ही तेवढीच होती. त्यामुळे गेल्या तीन चार महिन्यात कोणीच चिखलदरा कडे फिरकलाच नाही. परंतु आता काही दिवसापासून पूर्णतः अनलाक झाल्यावर विकेंड लाकडाऊन असल्याने शनिवार व रविवारी सुट्या असतात त्या दिवशी शासकीय नोकरदार वर्ग पिकनिक साठी निघतात. अन त्याच दिवशी शासनाने लाकडाऊन लावला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी वर्ग कामालिचे परेशान झाले आहे. पर्यटक नसल्याने त्यांचा शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील व्यापारी वर्गाचा उदरनिर्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच सध्यस्थीतीत जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव अत्यंत कमी झाला आहे. जवळपास सर्वच बाजारपेठ व शासकीय, राजकीय सर्वच कार्यक्रम सुरु आहेत. मग पर्यटकासाठीच का बंदी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
