गोलाई येथे स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमामध्ये अनियमितता...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

तालुक्याच्या मुख्यालयापासून  50 किमी अंतरावर असलेल्या धारणी तालुक्यातील गोलाई येथे स्वच्छालय बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे रमेश सुभाष फड रा.गोलाई यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.रमेश फड यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार गोलाई ग्रामपंचायत मध्ये 2013-14पासून ते 2020-21पर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. गावातील जे शासकीय पदावर अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना या योजनेतून शौचालय बांधून देऊन रक्कम काढून देण्यात आली आहे. यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी लाभार्थी सोबत संगमत करून लाखो रुपयांचा चा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे.याबाबत रमेश फड यांनी अनेकदा तक्रारी दिल्या असून यावर एकदा ही चौकशी झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.यामध्ये त्वरित चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Previous Post Next Post