हिवरखेड ओंम नगरातील मोठा महादेव संस्थान मध्ये दिनांक २९ जुलैच्या संध्याकाळी कोरोनाचे पालन करून साध्या पद्धतीने जनजागृती विषयावर सांस्कृतिक कीर्तन पार पडले, विशेष म्हणजे हे कीर्तन १२ वर्षाचे महाराज ह,भ प,कृष्णा महाराज सदाफळे यांनी केले , महाराजांनी त्याच्या कीर्तनात सांगितले तरुणांनि व्यसनाच्या नांदी न लागता गौसेवा व देश सेवेचा नाद करावा तसेच आपला गाव आपले नगर स्वच्छ ठेवावे असे हे बालकीर्तनकार महाराज म्हणाले या कीर्तना करिता मोलाचे मार्गदर्शन पवन महाराज सोनोने यांचे लाभले असून मोठा महादेव संस्थांच्या सेवेकरांनी पुढाकार घेतला, या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी महिला ,पुरुषांनी हजेरी लावली तर अनेक चिमुकल्या विद्यार्थी सुद्धा कीर्तनाला रंगत आणली आणि पाल्य वर्गानी त्याच्या मूला बाळांवर सांस्कृतिक संस्कार देण्यासाठी त्यांना बालसंस्कार शिबिरात पाठवावे असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले,
तरुणांनी व्यसन न करता गौसेवा देशसेवा करावी, ,,,बालकीर्तनकार ह,भ,प, कृष्णा महाराज,मोठा महादेव संस्थानाचा पुढाकार,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.