मोनिका चौधरी यांना बाघ रक्षक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पंतर्गत बफर झोन मधील वनपरीक्षेत्र जामली मध्ये वनरक्षक पदावर कार्यरत कु. मोनिका चोधरी या महिला वनरक्षकास त्यांच्या  उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकार द्वारे 'बाघ रक्षक' हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील नऊ उत्कृष्ट व्याघ्र प्रकल्पा पैकी तिसरा प्रकल्प असून या ठिकाणी वाघाच्या अधिवासासाठी पोषक वातावरण आहे. क्षेत्रफलाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.या प्रकल्पामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत कु. मोनिका चौधरी यांनी वन्यजीव संरक्षनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावरील बाघ रक्षक पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर केले आहे.यामुळे पुन्हा एकदा मेळघाट व्याघ्र प्रकल्प केंद्रात चर्चेत आला आहे.

Previous Post Next Post