वर्षावास कार्यक्रमानिमित्त . बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथ पठणाचे साखरखेर्डा येथे आयोजन ! ।धम्मदेसना व खीरदानाने कार्यक्रमाची सुरुवात !... ! पुज्य भदंत गुणरखित . करणार ग्रंथाचे पठण...


 सिंदखेड राजा:- ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे वर्षावास प्रारंभ कार्यक्रमानिमित्त .समाज मंदिर सभागृहात बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे पठण करण्यात येणार आहे .या ग्रंथाचे वाचन पूज्य भदंत . गुणरखीत . (खडकी पाळा )हे करणार आहेत .या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी आज दिनांक 24 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आली .यावेळी पूज्य भदंत गुणरखीत यांनी सुरुवातीला  त्रिसरण पंचशील ' धम्मचक्र परिवर्तन सुत्ताचे  पठण . व सुत्तदेसनाचे पठण केले .तसेच उपस्थितांना धम्मदेसना उपदेश दिला ..त्यानंतर महाबोधी वृक्षाचे पूजन करण्यात आले ..यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते .त्यानंतर समस्त समाज बांधवांना वाटण्यात आली .तथागत भगवान गौतम बुद्धद्वारे आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचा उपदेश सारणाथ याठिकाणी देण्यात आला होता .तसेच वर्षावासाची सुरुवात ही करण्यात आली होती ..या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून हा .वर्षावास प्रारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला आहे .हा कार्यक्रम आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा .24 जुलै 23 ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे .तरी समस्त समाज बांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे .

Previous Post Next Post