माखला रस्ता दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी.रोहित राजकुमार पटेल यांनी निवेदनद्वारे केली..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाट मधील सेमाडोह वरून मखला मार्ग हार्दिक त्या अतीवृष्टीने खचल्यामुळे हा मार्ग त्वरित दुरुस्त करण्यात यावा.त्याकरिता शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी युवा नेता रॊहीत राजकुमार पटेल यांनी केली आहे.माखला मार्ग हा मेळघाट मधील अतिशय महत्वाचा रस्ता असून या मार्गांमुळे चाळीस गावे मुख्य महामार्गाशी जुळतात.या मार्गांवर सतत वाहणांची वर्दळ असल्याने रस्ता चांगला असणे गरजेचे आहे.अतिवृष्टीने या रस्त्यावर दरळ कोसळले आहे व भागदाळ पडले आहे.ते त्वरित दुरुस्त करण्याकरिताव सरक्षण भिंत उभारणी व बॅरिकेट्स बसवण्याकरिता शासनाने निधि उपलब्ध करून देण्याची मागणी रोहित राजकुमार पटेल माजी प. सं. सभापती धारणी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदणाद्वारे केली आहे.जेणेकरून कुठलीही अपरिहार्य घटना घडणार नाही.

Previous Post Next Post