साखरखेर्डा ते औरंगाबाद बस सुरु..


 सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

 प्रवाशांची मागणी लक्षात घेता मेहकर आगार प्रमुखांनी मेहकर -- साखरखेर्डा -- जालना -- औरंगाबाद ही बस फेरी२४ जुलै पासून सूरु करण्यात आली आहे . साखरखेर्डा हे गाव मेहकर , चिखली शहरापासून ३० कि मी अंतरावर आहे . या गावाची लोकसंख्या १८ हजार असून संलग्न ३५ खेडी आहेत . जालना आणि औरंगाबाद ही अर्थीक आणि वैद्यकीय दृष्टीने महत्वाची शहरे असल्याने दररोज शेकडो प्रवाशी प्रवास करतात . साखरखेर्डा -शेंदुर्जन-- मलकापूर पांग्रा या तीन जिल्हा परिषद सर्कल मधून केवळ एकच बस या मार्गावर धावत होती . प्रवाशांनी आपली अडचण माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख यांना सांगितली . त्यांनी तत्काळ दखल घेऊन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याशी संपर्क साधून मेहकर आगार प्रमुख रनधिर कोळपे यांना पत्र दिले . प्रवाशांची सततची मागणी लक्षात घेता आज सकाळी ९ वाजता ही बस साखरखेर्डा बस स्थानकावर आली . जिल्हा परिषद सदस्य राम जाधव , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीरअप्पा बेंदाडे यांनी वाहक जी बी करवते आणि चालक एक . यु . मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला . यावेळी पिंपळगाव सोनारा येथील सरपंच तोताराम ठोंसरे , जमना प्रसाद तिवारी , माजी उपसरपंच शेख शफी जमादार , माजी प्राचार्य डी एन पंचाळ अमरसींग राजपुत उपस्थित होते . 

Previous Post Next Post