कला वाणिज्य महाविद्यालय वरणगांव येथील प्राध्यापक अनिल शिंदे यांना पीएचडी प्रदान...


 वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ 

वरणगाव जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचालित कला वाणिज्य महाविद्यालय वरणगाव येथील प्राध्यापक अनिल हरी शिंदे यांना नुकतीच पीएचडी पदवी बहाल करण्यात आली यावेळी प्राध्यापक अनिल शिंदे यांचा सत्कार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला हा सत्कार समारंभ  संपन्न झाला.प्राध्यापक अनिल शिंदे हे 19 94 पासून वरणगाव येथील महाविद्यालयामध्ये ज्ञानदानाचे कार्य करत आहेत 2013 पासून शिंदे यांनी कवित्री बहिणाबाई विद्यापीठांमध्ये पीएचडी साठी सुरुवात केली बीटालाईट या विषयावरती शिंदे यांनी संशोधन करून पीएचडी पूर्ण केली आहे या संशोधनासाठी शिंदे यांना मुक्ताईनगर येथील जे जे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले हे संशोधन पूर्ण करण्यासाठी शिंदे यांना आठ वर्षाचा कालावधी लागला आहे धनगर समाजातील पीएचडी पदवी मिळवणारे वरणगाव येथील पहिला मान हा प्राध्यापक अनिल हरी शिंदे यांना मिळाला आहे त्यामुळे धनगर समाजातील प्राध्यापक अनिल हरी  शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.रसायनशास्त्र विषयात पीएचडी परीक्षा पास झाल्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून भावी आयुष्यासाठी व प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या व सरांचा सत्कार करून तुमच्या हातून असेच विद्यादानाचे समाज कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या याप्रसंगी धनगर समाज अध्यक्ष शामराव धनगर विकास बोरसे सुखदेव धनगर पप्पू ठाकरे गजानन धनगर बाळू धनगर रुपेश धनगर शिवाजी धनगर प्रदीप धनगर बळीराम कोळी आदी उपस्थित होते

Previous Post Next Post