प्रतिनिधी:-राजु भास्करे.
दाभीया येथूया रंजना मधू हेकडे या मातेच्या सीझर नंतर मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी रंजनाच्या कुटुंबियांचे बयान नोंदविले.दाबीया येथील रंजना मधू हेकडे हीचे डॉ. सुशीला नायर हास्पिटल मध्ये सीझर झाले त्यानंतर ती दगावली. त्यामुळे नातेवाईकांनी दवाखान्यात चुकीच्या पद्धतीने सीझर झाल्याने आमची मुलगी दगावली त्यामुळे त्यांनी मृतकेचा पती व वडिलांनी पोलिसात तक्रार दाखलकरून संबंधीत डॉक्टर वर कार्यावहीची मागणी केली आहे.बिजूधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत दाबीया उपकेंद्रातील दाबीया गावाची सौं रंजना मधू हेकडे वय 22 हीचीं पहिली प्रसूती सामान्य झाली होती, दुसऱ्या बाळंतपणासाठी ती आपल्या माहेरी कोठा येथे गेली होती.तिला पोटात प्रसूती वेदना होत असताना कुटुंबियांनी तिला हरिसाल प्रा. आ. केंद्रात दाखल केले, तेंव्हा रंजना पायी स्वतः चालत गेली.हरिसाल प्रा. आ.केंद्रातील डाक्टरांनी तपासून उपजिल्हा रुग्णालय धारणीचे संदर्भ सेवा पत्र देऊन प्रा.आ. केद्राच्या रुग्णवाहिकेणे डॉ.सुशीला नायर हास्पिटल उतावली येथे पाठवले. तेथे दि.9.7.2021 रोजी रात्री 10 वाजता दरम्यान पाठवले भरती केले.व रंजनाच्या आई व पतीच्या सांगण्यावरून 10.7.21 रोजी सकाळी 7.11 वाजता रंजना चे नायर हॉस्पिटल मध्ये सीझर केले. तेव्हा पासून दुपार पर्यंत आई आणि बाळ दोघेही चांगले होते. दुपार नंतर रंजनाचीं तब्बेत बिघडत गेली व तिच्या पोटावर सुझन आली व तो सूज वाढतच गेली. त्याकडे डाक्टरांनी लक्ष दिले नाही असा नातेवाईकांचा आरोप आहे. जेंव्हा दुसऱ्या दिवसी नातेवाईक प्रसूती ला पाहायला आले तेंव्हा रंजना चीं तब्बेत खूप खालावली होती.नातेवाकांनी डॉक्टरांची भेट घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केल्यावर त्यांनी अमरावती ला पेशन्ट घेऊन जाण्याचा सल्ला दिला तेंव्हा नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातील अधिक्षिका डॉ.रेखा गझलवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे रुग्णला आणण्याबाबत सांगितले त्यानुसार नातेवाईकांनी रुग्ण डिस्चार्ज करण्याबाबत विनन्ती केली परंतु दवाखान्याचे बिल आधी भरा अश्या सूचना डॉ. नायर हास्पिटल च्या नातेवाईकांना दिल्या तडजोड करून डिस्चार्ज दिले तर पेशंट नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स दिली नाही. तेंव्हा मृतकेच्या पतीने दाभीया उपकेंद्रात फोन करून ऍम्ब्युलन्स पाठवण्याची विनन्ती केली. त्यांनी बिजूधावडी प्रा आहे केंद्राची सुमो गाडी पाठवलीत्यामध्ये सीझर झालेली माता चालत गाडीत बसली. तेंव्हा व उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात कसोशीने प्रयत्न केले परंतु तेव्हा प्रसूती महिलेची प्रकृती अत्यंत खालवली होती. तेथे तीन बॉटल रक्त ही देण्यात आले. व अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठवले रात्री 1.45 वाजता गेल्यावर डॉक्टरांनी तपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले तेथे जाताच डाक्टरांनी मृत घोषित केले.आमची मुलगी घरून चांगली गेली कुठलेही ताप किंवा कोणता आजार नव्हता,डॉ सुशीला नायर हास्पिटल मध्ये भरती केल्यावर डॉक्टरांचा हलगर्जी पणामुळे तिची तब्बेत खराब झाली त्यांनीच आमच्या मुलीचा जीव घेतला,संबंधित डॉक्टरवर कठोर कार्यवाही व्हावी,अशी मागणी मृतकेचे वडील फुलचंद गायन व पती मधू हेकडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे.या घटनेने मेळघाट मध्ये दवाखाना मध्ये प्रसूती करण्याबाबत लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे.
