पूरग्रस्त म्हणून बहुचर्चित असलेल्या पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील म्हाड,पोलादपूर,कोल्हापूर,चिपळूण व इतर पुरग्रस्त शहरांतील लोकांच्या मदतीकरिता जमियते उलमाए हिंद शाखा लोणारच्या वतीने पुढाकार घेऊन दि.३०/०७/२०२१ शुक्रवार रोजी ५० हजार ३१८ रुपयांची वर्गणी करून मदतीचा एक हाथ पुढे केला आहे.शुक्रवारच्या विशेष नमाज अगोदर लोणारच्या सर्व मस्जिदीत या एकाच विषयावर सर्व मौलानांनी तकरीर करून लोकांपर्यंत पूरग्रस्तांच्या वेदना पोहोचविले तसेच धर्म कोणताही असो यामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म हा मानवतेचा आहे व ईश्वराने मानवाला एकमेकांच्या मदतीसाठी पवित्र कुरआन मध्ये विशेष आदेश दिलेले आहे याची जाणीव करून प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीची आठवण यावेळी करून देण्यात आली. अडचणीच्या वेळेत "लोकसेवा हिच हिच खरी ईश्वर सेवा आहे" याची जाणीव लोकांना करून देण्यात आली व सर्वांनी धर्मनिरपेक्षतेचे पालन करून आपापल्या क्षमतेनुसार पूरग्रस्तांसाठी योगदान द्यावे असे आवाहन सर्व मुस्लिम बांधवांना करण्यात आले. क्षणातच सर्व लोकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला व लोणारच्या सर्व मस्जिद मधून एकूण ३५५६८/ रुपयाचा निधी जमा झाला. नमाज नंतर दुपारी "पूरग्रस्तांसाठी मदत रॅली" या नावाखाली एक रॅलीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे प्रत्येक घर-घर,मोहल्ले,चौक-चौराहे, मंदिर-मस्जिद, व्यापार मार्केट, दुकानदार व कार्यालयांमध्ये जाऊन मदतनिधी मागण्यात आली. सर्वांनी आपापल्या सोयीनुसार या लॉकडाऊन मध्ये सुद्धा मदत केली. यामध्ये पाच रुपये पासून पाचशे रुपये पर्यंतची मदत सर्व हिंदू- मुस्लिम समाज बांधवांनी केले एकूण १४७५०/ रुपये या रॅलीच्या माध्यमातून जमा करण्यात आले.मस्जिद व रॅली मधून जमा करण्यात आलेली एकूण रक्कम ५०३१८/पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आले. महाराष्ट्रभर हा उपक्रम जमियते उलमाए हिन्दच्या वतीने राबविण्यात येत असून प्रत्येक गाव तालुक्यातून लाखो रुपयांची मदत गरजू लोकांच्या जीवनावश्यक वस्तू व त्यांच्या जीवन सुरळीत करण्याकरिता पाठविण्यात येत आहे तसेच प्रत्यक्ष रिलीफ कॅम्प लावून त्यांची मदत करण्यात येत आहे.त्यांना तातडीने खाण्यापिण्याचे साहित्य, आरोग्य विषयक सोयीसुविधा "रिलीफ कॅम्प" लावून मदत पोहोचविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मागील वर्षी सुद्धा कोल्हापूर, सोलापूर,सातारा,सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता जमियत उलमा लोणार च्यावतीने ८०४५०/अंशी हजार चारशे पन्नास रुपयाची मदत गोळा करून पाठविली होती. सर्व लोकांनी पूर प्रभावित लोकांची मदत करण्याकरिता आपापल्या स्तरावर पुढाकार घ्यावा असे आव्हान जमियत उलमाए हिंद लोणार शाखेच्या वतीने करण्यात आले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमियते उलमाए हिंद लोणारचा पुढाकार; ५०३१८/ रुपयांची वर्गणी करून दिला पूरग्रस्तांना मदतीचा हाथ..
लोणार ता.प्रतिनिधी:-संदिप मापारी पाटील.