राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चूर्नी परिसरात मध्य प्रदेश मधून वीज पुरवठा होत असल्याने नियमित वीज राहत नाही वेळोवेळी विजेचा पुरवठा खंडित होत असते,या परिसरातील बेचाळीस गावातील लोकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने .त्यामुळे जारीदा येथे 33/11 के. व्ही. उपकेंद्र निर्मितीसाठी दहा कोटी निधी उपलब्ध करून देण्याबसाठी पालक मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांना निवेदन दिले होते.त्यानुषंगाने पालकमंत्रीयांनी अथक प्रयत्न करून चूर्नी जि.प. सर्कल मध्ये विजेचा सतत लपंडाव होत असल्याने परिसरातील लोकांना नाहक त्रास होत आहे. जीवनावश्यक सर्व बाबी विजेशिवाय अपूर्ण असल्याने या परिसरात नाहक त्रास होत आहे त्याकरिता दहा कोटी चा निधी राहुल येवले यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर करण्यात आला.
