वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ
भुसावळ चे आमदार संजय सावकार यांच्या स्थानिक आमदार निधीतून आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयास आरोग्य इंस्ट्रूमेंट भेट देण्यात आली.कोरोनाची येणारी तिसरीला पाहता हॉस्पिटल्स सज्ज असावेत म्हणून स्थानिक आमदार निधीतून आमदार संजय सावकारे यांनी वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आज आरोग्य साहित्य भेट दिली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर नी तू पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे माजी उपनगराध्य अखलाक शेख कामगार नेते मिलिंद मेढे माजी नगरसेवक गणेश धनगर महेंद्र सोनवणे आकाश इंगळे शितल बोदळे दिलीप गायकवाड भावना प्रजापति पल्लवी सुरवाडे प्रीती आराक करूणा चव्हाण मोहिनी सपकाळे वर्षा मोरे उदय बोंडे व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गुरव यांनी केले
