AIMIM चे शहराध्यक्ष समीर आर्यन यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत दाभाडे यांचे कौतुक....


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यात  सेक्युलर समजणाऱ्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत दाभाडे साहेब यांचा आदर्श घ्यावा.जेणेकरून स्वयंघोषित नेत्यांना हा विषय फार महत्त्वाचा आहे जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे व त्या नेमणुकीत काही नेत्यांनी डाव साधून मुस्लिम समाजावर एका प्रकारचा राजकीय अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी  डॉक्टर प्रशांत दाभाडे यांनी प्रशासक मंडळावर झालेली स्वतःची निवड डॉक्टर प्रशांत दाभाडे यांनी स्वतःहून आपल्या प्रशासक पदाचा राजीनामा माननीय पक्षनेत्याकडे सोपवलेला आहे. डॉक्टर प्रशांत दाभाडे यांच्या या कार्याला सेलुट करीत AIMIM चे शहराध्यक्ष समीर आर्यन यांनी डॉक्टर प्रशांत दाभाडे यांच्या कार्याचे गुणगौरव केले. मतदानासाठी मुस्लिम समाज आणि काही पक्षाकडून भेटल्याचा असेल तर हा समाज का वगळल्या जाते जळगाव जामोद तालुक्यातील मुस्लिम समाजात फार असंतोष निर्माण झालेला आहे. पुढे नगरपरिषद निवडणूक आहे तरी पक्षाकडून अल्पसंख्यांक समाजावर हा अन्याय सहन झाल्यासारखं नाही म्हणून या विषयावर नेत्यांनी लक्ष देणे फार गरजेचे आहे।  अशी मोठ्या मणाची माणसं राजकारणात असावि ,असे मत MIM चे शहर अध्यक्ष समीर आर्यन यांनी व्यक्त केले आहे

Previous Post Next Post