लोणाझरी गाव झाले चिखलमय ग्रामविकास अधिकारी अनुपस्थीत...

राजु भास्करे /चिखलदरा 

जनतेच्या मुलभुत विकासाचा पाया समजल्या जाणाऱ्या मेळघाटातील ग्रामपंचायतीची पुरती अवस्था झाली असुन अतिदुर्गम भागात ग्रामपंचायती अस्तीत्वहीन व कुचकामी ठरलेल्या दिसुन येत आहेत. आता तर मुख्यमार्गावरील ग्रामपंचायतींना भयंकर कोरोनाची लागन झाली असुन नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण अद्याप करता आले नाही. अनेक वेळा ग्रामपंचायतीत उघडपणे होत असलेल्या भष्ट्राचारावर रामबाण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. पण किडलेल्या राजकारणामुळे त्यांनी गुडगे टेकले. चिखलदरा तालुक्यातील सलोना गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या लोनाझरी गावातील राजकिय नेत्यांनी आदिवासी विकासाचा वसा घेऊन जिल्हातील राजकारणात ठसा उमटविला.  घंटाग ते चिखलदरा मार्गावर लोनाझरी गाव आहे. आज या गावची अवस्था जनावरांच्या कोठ्या सारखी झाली आहे. देशाचे प्रधानमंत्री अभिमानाने देश स्वच्छ करायला निघाले आहेत. पण इंथ सलोना ग्राम पंचायतीने गावात जनतेच्या पैशातून अस्वच्छता पसरवण्यासाचे एक छत्री कार्यक्रम सुरू केले आहे. ग्रामीण विकासाच्या चित्राची किती बिकट अवस्था आहे हे लोनाझरी येथे उघडपणे दिसुन येते. ह्या गावासारखीच स्थीती सर्वत्र आहे. अजिबात तांत्रिक ज्ञान नसलेल्यांनी विकास कामे सुचविल्याने सलोना गावात आजारांचे केंद्र निर्माण केले असल्याचे मानले जाते. पावसाळ्यात संपूर्ण गाव चिखलमय झाल्याने डासांचा प्रार्दुभाव होत आहे. ज्या कामात जास्त पैसे वाचतील अशी कामे मंजूर करण्यात ग्राम पंचायती रस घेत असल्यामुळे गावातील अंतर्गत रस्ते चिखलाने माखले आहे. ग्राम सचिवांना जसे मंत्रालयातुन मुख्यालयी अनुपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत तसे मुख्यालयातून बेपत्ता राहत आहे. अशीच अवस्था सर्वत्र आदिवासी पट्यात दिसत असल्यामुळे ग्रामीण विकासाकरीता ग्राम पंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणने अतिशय गरजेचे आहे. 

🔷प्रतिक्रिया🔷

लोनाझरी येथील जनतेचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी ग्राम सचिवांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. ग्राम पंचायतीच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर पुढील कार्यवाही करण्यात येईल. 

प्रकाश पोळ

गटविकास अधिकारी

चिखलदरा

 

Previous Post Next Post