राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी पासून साठ कि. मी अंतरावरील धुळघाट रेल्वे यथे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती च्या वतीने दयाराम काळे सभापती समाज कल्याण जि.प. अमरावती यांचे हस्ते लहान मुले व वृद्धाना ग्लुकॉन डी पावडर चे वितरण केले आहे.मेळघाट मधील वृद्ध व लहान बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे व त्यांची प्रकृती ठणठणीत राहण्याच्या दृष्टीने सदर पॅकेट चे वाटप करण्यात येत असल्याचे संचालक साबळे यांचे मार्फत सांगण्यात आले. या प्रसंगी धुळघाट चे सरपंच रामभाऊ भिलावेकर, माजी पस उपसभापती चंद्रशेखर सपाटे, चिखलदराचे विनायक येवले राणीगांव चे सरपंच आदी उपस्थित होते.
