राजर्षी शाहू बँकेत स्वर्गवासी शिवशंकर भाऊ पाटील तसेच गणपतराव देशमुख यांना वाहण्यात आली श्रद्धांजली...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्थानिक जळगाव जामोद शहरातील राजर्षी शाहू बँकेत दिनांक 10 ऑगस्ट रोजी राजर्षी शाहू बँकेच्या वतीने शेगाव संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी स्वर्गवासी शिवशंकर भाऊ पाटील तसेच सांगोला मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार लोकनेते स्वर्गवासी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून या दोन्ही महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याबाबत उपस्थित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमासाठी नगरपरिषद जळगाव जामोद चे शिक्षण सभापती रमेश ताडे, गजानन मानकर, मोहनलाल गुप्ता,अँड.शिरीष मारोडे ,अँड. अभिमन्यू वाघ,निलेश खुपासे, अनंता चरखे, प्रकाश खडसान, पप्पू बोंबटकर, संदीप खंडारे, दीपक बुले, प्रसाद दादा देशमुख, मनोज वाघ,प्रतीक गावंडे, गणेश देशमुख तसेच बँकेचे व्यवस्थापक सौ नूतन वाघ कर्मचारी अतुल मुरांडे अनंता हुरसाल यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post