धारणीत कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव संपन्न...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणीत कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सवाचे आयोजन बालाजी मंगलम येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाट्न मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते झाले असून अध्यक्ष पस सभापती सौं. सुलोचनाताई जांबेकर, व प्रमुख अतिथी म्हणून प. स. चे उपसभापती जगदीश हेकडे  होते.प्राचीन काळापासून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन आहारात वापरण्यात येत असलेल्या राणभाज्याची नव्या पिढीला विसर पडलेला असुन या रानभाज्यांच्या प्रथिनाबद्दल युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे या आरोग्यासाठी उत्तम असलेल्या रानभाज्या आजच्या युगात युवा पिढीच्या आहारातुन दुरावलेल्या आहे.या करीता राज्याच्या कुर्षी विभागाने या रानभाज्यांची ओळख निर्माण व्हावी म्हणून राज्या विविध ठिकाणी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत हा रानभाजी महोत्सव धारणीत पार पडला आहे.नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत धारणी येथिल क्रुर्षी विभागाकडून या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . सातपुडा पर्वतरांगात अनेक प्रकारच्या रानभाज्यांच्या प्रजाती उपलब्ध आहेत. पण या रानभाज्यांचे आजच्या पिढीला योग्य माहीती नाही.त्यामुळे आजच्या युगात या नैसर्गिक प्रथिनयुक्त रानभाज्यांच्या आयुर्वेदिक गुणाबद्दल नागरिक अनभिज्ञ असल्यामुळे नानाविधी जिव घेणे आजार फोफावत आहे.  कंदमूळभाज्या, फुलभाज्या, हिरव्याभाज्या, फळभाज्या पावसाळ्याच्या सुरवातीला जंगलात आढळून येतात. रानभाज्यांच्या संवर्धनातुन आदिवासींची कुटूबांची आर्थिक स्थिती चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असुन या रानभाज्यांच्यातुन मिळणाऱ्या प्रथिनातुन राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण सोडविले जाऊ शकते. अनेक राणभाज्यात तर शरीराला पोषक असे औषधी गुणधर्म आहेत. पावसाळ्यात वेलीवर लागणारे कटोंली या रानभाजीत तर गर्भवती आणी लहान बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. कुरडू यांच्या बिया मुतखड्यासाठी आणि जुनाट खोकला, व्रुध्दाच्या कफ विकारांवर उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे.

Previous Post Next Post