रस्ता, वीज, शुध्द पाणी झाले दिवास्वप्न.मुलभूत सुविधा पासुन कोसोदुर आहे रक्षा...


 राजु भास्करे /चिखलदरा

मेळघाटच्या चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत रक्षा गाव आजही मुलभूत सुख-सुविधा पासुन कोसो दुर आहे. या गावातील ग्रामस्थांचा आजही जगण्या करीता संघर्ष सुरू आहे. गावात पोहचण्यासाठी पक्का रस्ता तर दुरच साधा कच्चा रस्ताही नाही. पायवाटेने या गावात जावे लागते. गावापर्यंत पोहचण्यासाठी तीन ते चार नाले ओलांडावे लागतात. गावात वीज पोहचली नसल्याने संपूर्ण गाव सौर ऊर्जा वर अवलंबून आहे. पावसाळ्यात ऊन पडत नसल्याने रात्री मात्र दिवे लावण्यावाचून पर्याय नसतो. पाणीपुरवठा सुध्दा पावसाळ्यात बंद पडत असल्याने गावकऱ्यांना जगंलातून पाणी आणावे लागतो. या गावाची नोंद सरकारी दप्तरी आहे की, नाही असा संशय या गावाच्या समस्या पाहुन येतो.गावात जाण्या करीता तीन ते चार नाले लागते. या ठिकाणी पुलाचे काम करण्याची गरज आहे. गावाला पक्का जोड रस्ता नसल्यामुळे जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे पावसाळ्यात रक्षा गावाचा मुख्यालयाची संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत गावात मोठा आजार उध्दवला किंवा प्रस्तुती करायची असल्यास कशाबशा उपाययोजना करुन काम भागवावे लागते. एवढेच नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीमधे सुध्दा प्रशासनाला जर रक्षा गावात पोहोचायचे असेल तर जास्त पावसाच्या काळात गावात पोहोचणे अशक्यच आहे.



🔷शैक्षणिक सुविधांपासून वंचित...🔷

येत्या 15 आॅगष्ट रोजी स्वतंत्र भारताचा 'अमृतमहोत्सव' साजरा होणार आहे. स्वातंत्र्याला 150 वर्षे पूर्ण झाल्यावरही आज रक्षा गावातील नागरिक पारतंत्र्यात जीवन जगत असल्याचे चित्र आहे. गावात वीजजोडणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आॅनलाईन सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. या गावाचा भौतिक तर दुरच पण शैक्षणिक विकास होणेही कठीण झाले आहे.

Previous Post Next Post