मंगल काकडे:-पिंपळगाव काळे. प्रतिनिधी.
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे ७ ऑगस्ट २०२१ शनिवार रोजी माळी समाजातर्फे संत शिरोमणी श्री सावता माळी यांना ७२६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान भजनी मंडळी तर्फे श्री.संत.सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभंगाचे गायन व आरती करून शेवटी संत शिरोमणी श्री सावता माळी की जय 'चा जयघोष करण्यात आला. व महाप्रसाद वाटप झाला. त्यानंतर संध्याकाळी पूर्ण गावातून समाज बांधवांकडून आगळी वेगळी मिरवणूक काढण्यात आली.बैलगाडीवर संत शिरोमणी श्री सावता माळी यांची प्रतिमा ठेवून व हार घालून टाळ- मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी ठीकठिकाणी स्वागत करीत पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या व शेवटी पालखीची सांगता करण्यात आली. व सर्व समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
