पोलिसांच्या नांवावर वाटमारी करत.पर्यटकांना लुटणारे जसापुरचे तीन युवक ताब्यात...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

कोरोना नियम शिथिल झाल्यानंतर मेळघाटातील पर्यंटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी चिखलदरा व धारणी तालुक्यातील काही भागात पाहायला मिळते. पर्यटक आपल्या वाहनाने येत असताना त्यांना वाहतुकीचे नियम सागत नकली पोलीस होवून पर्यटकांना लुटणारे चांदुर बाजार तालुक्यातील जसापूर तीन युवकांना चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेतले. चिखलदरा तालुक्यातील मणकी मार्गावर हे तीन युवक नकली पोलीस बनुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांच्याकडून पैशाची वसुली करीत असत. वाटमारी करणाऱ्या या तीन युवकांची माहिती पोलिसांना मिळताच सात आगष्ट रोजी सकाळी 4:30 ते 5:30 वा. दरम्यान चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर निवासी गजानन सुभाष वाकोडे (30)आकाश दिलीप मोहेकर (27) रुपेश सुखदेव मोहेकर (35) या तिघांना दोन दुचाकी सह ताब्यात घेत त्याच्याकडून दहा हजार दोनसे रुपये जप्त करत कलम 392,505,506.34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रुपनार पीएसाआय  उईके, ईश्वर जाम्बेंकर, विनोद ईसळ, अर्जुन केंद्रे, संदिप देवकथे, रुपेश देशमुख, पुढील तपास करीत आहेत.

Previous Post Next Post