राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी शहरांत मोकाट जनावरे ही गंभीर समस्या होऊन बसली आहे.कधी कोणाचा बळी जाईल हे सांगता येत नाही. या बाबत नगरपनचायत ला अनेकदा कळवून सुद्धा दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.धारणी शहरांत ग्रामीण भागातील व स्थानिक लोकांच्या गर्दी मध्ये मोकाट जनावरांची भर पडली आहे.भररस्त्यावर मोकाट जाणवरंचा ठिय्या असल्याने वाहन चालवीतांना वाहन चालकामध्ये भीती निर्माण झाली आहे.कधी अपघात होईल हे सांगता येत नाही.मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे सातत्याने अपघातच्या घटना समोर येत आहेत.मोकाट जणावरांचे मालक आपल्या जाणवरांना मोकाट सोडून त्यांच्याकडे दुरूनच लक्ष ठेवतात. हे मोकाट प्राणी भररस्त्यावर आपसात एकमेकांसोबत मारामारी करतात.तेव्हाच क्षण माणसामध्ये धडकी भरणारा आहे.त्यामुळे महिला व मुलींना वाहने चालवीने कठीण झाले आहे बरेचदा महिलांचे दुचाकी ने अपघात झाले, त्यामध्ये काही जखमी झाल्यात त्यामुळे पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
*या परिसरातील असतो मोकाट जनावरांचा ठिय्या*
मधवा, बसडेपो, दयाराम चौक, होली चौक, जयस्तंभ चौक, तहसील कार्यालय समोर,कोर्ट समोर,गजानन महाराज मंदिर जवळ.मोकाट जनावरावर आवर घालण्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायतची आहे. त्यासाठी कर्मचारी नियुक्त असतात व त्याकरिता नगरपंचायत कडे मोठा निधी असतो. परंतु हे पथक शहरात कुठेही दिसत नाही. त्यांचा कामचुकारपणा या मोकाट जनावरांच्या समस्येचे मुख्य कारण आहे.
