भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे सिव्हील सोसायटी वरणगाव पोलीस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख व डीवायएसपी लवंड यांच्या हस्ते करण्यात आले.गरजू आणि आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरणगाव येथील दानशूर व्यक्तींकडून निधी उपलब्ध केला आहे ,या निधीतून पन्नास विद्यार्थ्यांना दोन महिन्याचा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षक यांच्या वतीने देण्यात येणार आहे, यामध्ये गरीब विद्यार्थ्यांकडून एकही रुपया फी घेतली जाणार नाही, अशी माहिती सिव्हील सोसायटीचे डॉक्टर राहुल भोईटे यांनी दिली आहे याप्रसंगी वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे व डॉक्टर राहूल भोईटे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम वरणगाव पोलिस स्टेशनच्या हॉलमध्ये झाला याप्रसंगी वरणगाव नगर परिषद चे मुख्य अधिकारी समीर शेख योगेश पाटील गणित तज्ञ प्रशिक्षक संजय घुगे जयंत जोशी सर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी माजी नगराध्यक्ष सुनील काळे दीपक भाऊ मराठे माजी नगरसेवक रवी भाऊ सोनवणे माजी संभाजी देशमुख नगरसेवक गणेश धनगर श्रीकांत माळी निलेश झोपे लखन कुंभार रामचंद्र पाटील कमलेश येवले अब्रार खान सलीम मुल्ला सामाजिक कार्यकर्ते संतोष माळी उपस्थित होते.सूत्रसंचालन गोपाळ बानाईत सर व आभार श्रीकांत माळी यांनी मानले
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन, गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण...
वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ
