घरकुलाचे अनुदान द्या,अन्यथा जीर्ण घरातच मरु द्या! निराधार महिलेची शासनाकडे मागणी...


 राजु भास्करे /चिखलदरा 

तालुक्यातील गौलखेडा बाजार या गावातील चार वर्षा पुर्वी कनीराम झिंगू काळे या व्यक्तीला घरकुल मंजूर झाले होते घरकुलाचा पहिला टप्पा मिळाला व घराच्या कामाला सुरुवात झाली काही दिवसानंतरच कनीराम हे आजारी झाले व दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेल्या पैशाच्या खालचा पाया बनवल्यानंतर परिवारातील सदस्यांना एकच आस होती की आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्या अगोदर आपल्याला घरकुल मिळाले व राहिलेले टप्पे स्वर्गीय कनीराम काळे यांच्या पत्नीला या राहिलेल्या टप्प्यांची रक्कम मिळणार आपले घरकुल पूर्ण होणार या आशेने आज पूर्ण चार वर्ष होत असून सुद्धा आज पर्यंत घरकुल चे राहिलेले टप्पे मिळालेले नाही या चार वर्षात आम्ही कसे राहलो कसे दिवस आम्ही काढले हे आम्हालाच माहीत असे म्हणने घरकुल लाभार्थीचे आहे. परंतु आता या पावसाळ्यात हे घर कधी पडणार हे सांगता येत नाही. आमच्या जिवाचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात. या घरकुल चे राहिलेले टप्पे आम्हाला द्या नाहीतर आम्हाला आमच्या या घरातच मरू द्या असे लाभार्थी आपले दुःख व्यक्त करीत आहेत. मृत्यू पडलेल्या पती नंतर पत्नीचा हक्क असतो परंतु असे काय झाले की या गरीब कुटुंबालाच या वेदना सहन कराव्या लागत आहे या प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर या गरीब कुटुंबाला राहिलेल्या टप्प्याचा लाभ शासनाने  द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.   

  🔷प्रतिक्रिया..🔷

यांचे डेथ केस स्टेट लेव्हल ला प्रलंबित आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.काही तांत्रिक अडचणी होत्या पण या 4 दिवसात त्याला मंजुरी मिळेल. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोंत. राज्य स्तरावरील विषय आहे.मृत्यू झालेले एकूण 15  केसेस होत्या त्या पैकी आता फक्त 3 प्रकरणे प्रलंबित आहेत.मी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी होत्या. परंतु येत्या चार दिवसात फाईला मजुंरी मिळेल. असे त्यांनी सांगितले. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोंत.

प्रकाश पोळ - गटविकास अधिकारी प. स. चिखलदरा

Previous Post Next Post