भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सरस्वती नगर मधील अर्णव पाटील या सहा वर्षाच्या चिमुकल्या ने खाऊसाठी ठेवलेले अकराशे अकरा रुपये हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजनाताई पाटील यांना सुपूर्द केले आहेत अर्णवला ही संकल्पना, न्यूज चॅनल ला पूरग्रस्तांचे प्रचंड हाल पाहून व विदारक चित्र पाहून त्याच्या मनात ही संकल्पना आली त्यामुळे या चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.चिपळूण कोल्हापूर सांगली या भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे त्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले आहे याकरिता वरणगाव येथील अर्णव पाटील या चिमुकल्या ने खाऊ साठी ठेवलेले अकराशे अकरा रुपये हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पूरग्रस्त निधीच्या फंडामध्ये जमा केली आहे हा अकराशे अकरा रुपये चा निधी वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष रंजना पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे यामुळे अर्णव पाटील चे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक भाऊ मराठे माजी नगरसेवक सुधाकर भाऊ जावळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील सर राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष कैलास माळी माजी नगरसेविका वैशाली देशमुख सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते महेश सोनवणे व असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खाऊसाठी ठेवलेले पैसे चिमुकल्याने दिले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी...
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ
