सिपना शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा येथे माजीv विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन 11/ 07/ 2021 ला केले होते. मेलघाट सारख्या अतिदुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्रात 1996 साली कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालया ची स्थापना करण्यात आली. याचा उद्देश्य होता मेलघाट मधील आदिवासी व गरीब होतकरू मुलाना उच्च शिक्षण देण्याचा. मेलघाट मधील 40 किलोमीटर क्षेत्रतील पाहिले महाविद्यालय. 8 ऑगस्ट 2021 ला या महाविद्यालय ला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आज पर्यन्त या महाविद्यालयात जावडपास 8000 विद्यार्थियानी प्रवेश घेतला. म्हणजेच मेलघाटला हे महाविद्यालय एक वरदान म्हणून लाभले. मेलघाटच्या लहान - लहान खेळयानमधून कित्येक विद्यार्थी या महाविद्यालय तुन शिक्षण पूर्ण करुन आज सरकारी व खाजगी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे. तर काही विद्यार्थी विदेशा मध्ये चांगल्या प्रतिष्ठीत व अंतराष्ट्रीय कम्पनी मध्ये कर्यरत आहेत. तर काही महाविद्यालय मध्ये प्राध्यापक आहेत. ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थी पण आहेत. अश्या या महाविद्यालयात दरवार्षि प्रमाणे या वर्षी ही माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले गेले. पण या वर्षी कार्यक्रमा चे स्वरूप आभासी म्हणजे ऑनलाइन होते. माजी विद्यार्थियांना विविध माध्यमातून आमंत्रित केले गेले. मेळाव्याला एकूण 60 माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी काही विद्यार्थीयानी आपले मत व्यक्त केले. आपन सर्व आप - आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त असताना जुन्या मित्राना भेटने होत नाही. परन्तु आज आभासी पद्धतिने झालेल्या या मेळाव्यात जुने मित्रा ना पाहिल्यावर जूनी आठवनी ताज्या झाल्या आहेत. आज सर्वाना पाहून खुप आनंद होत आहे. अश्या भावनानी या कार्यक्रम ला सुरवात झाली. या मेळाव्याचे संचालन करताना प्रा. बक्षी यानी सर्व प्रथम सर्वांचे स्वागत केले व मेळाव्याचे उद्धेश्य सांगितले. सिपना माजी विद्यार्थी संघटना चे अध्यक्ष डॉ. सचिन मिश्रा यांनी आपले मत व्यक्त करताना आव्हान केले की माजी विद्यार्थीयांनी आपल्या इच्छेने महाविद्यालया ला मदत करण्यास समोर यावे. काही पुस्तक स्वरूपात, अथिति व्याख्यानाच्या स्वरूपात तर काही आर्थिक स्वरूपात आपन महाविद्यालया ला मदत करू शकतो. अमोल त्रिपाठी यांनी विद्यमान विद्यार्थि साठी कोणतेही मदत असल्यास मी करायला तैयार आहे अशी भावना व्यक्त केली तर डॉ. विशाल गजभीये यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की स्पर्धा परिक्षे मधे टीकायचे असेल तर गाँवातील विद्यार्थयांना आपले विचार बदलण्याची आवश्यकता आहे. आपन एक खेड्या गाँवत राहतो म्हणून स्पर्धा परीक्षा मध्ये आपला टिकाव होणार नाही हा विचार बदलून स्पर्धा परिक्षेची तैयारी करावी लागणार आहे. पुढे त्यांनी प्रकाश तायड़े व नरेन्द्र तायडे (पोलिस निरीक्षक ) यांचे उदाहरण दिले. एका खेडयातुन आलेले व आपल्याच महाविद्यालया चे विद्यार्थी आज एम.पी.एस. सी. पास करुन पोलिस निरीक्षक या पदावर आहे. प्रकाश तायडे यांनी आपले मत व्यक्त करताना विद्यमाण विद्युर्थीयाना सूचवीले की यश संपादन करायचे असेल तर विचाराना कृतित आनावे लागेल व कृतित आणायला गुरुची साथ अति आवश्यक आहे आज मला जे स्टार लागले आहे ते फ़क्त या महाविद्यालयातील गुरू मुळे. पुढे मयूर खरबे या माजी विद्यार्थी याने जियोलॉजी सोबत फिजीक्स हा विषय जोड़वे अशी सुचना व विनती महाविद्यालया ला दिली. पुष्पा झामरकर ने आपले मत व्यक्त करताना सांगितले की, मी मेलघाट मधील चिखलदर तहसील मधल्या सलोना सारख्या खेड्या गवातून आहे. आज मी नागपुर शहर सारख्या मोठ्या शहरात शिवाजी संस्था च्या मोठ्या महाविद्यालयात जियोलॉजी विभागात साहय्यक प्राध्यापक पदावार कार्यरत आहे. ते फ़क्त या महाविद्यालया मुळे. या महाविद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षक यांचे सम्बन्ध एका परिवारा सारखे असते व महाविद्यालयाचे वतावरण हे पूर्ण पणे फ्रेंडली असते. येथे पुस्तकी ज्ञाना सोबत मोट्याचे आदर करने व समाजात आदर - सम्माना ने कसे वागावे याचे पण शिक्षण दिले जाते. महाविद्यालयात कंप्यूटर सेक्शन मध्ये कम्प्यूटर ची संख्या वाढवावी अशी सुचना देत त्यांनी आपल्या मताला विराम दिला. अश्या प्रकारच्या काही सुचना व मत माजी विद्यार्थीयांनी व्यक्त केल्या. कार्यक्रम च्या शेवटी कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य व माजी प्र - कुलगुरु डॉ. राजेश जयपुरकर यांनी मेळाव्याचे उद्दीष्टे पटवून देत महाविद्यालयाची माहिती दिली. 1996 साली लावलेले एका रोपट्याचे आज विकसित झाड़ामध्ये रूपांतर झाले आहे.या महाविद्यालयाने आपल्या 25 वर्षाच्या कालावधित यशाची एक एक पायरी गाठत विद्यार्थयांचा व स्वतःचा विकास केला आहे व तीन दा नैक करत B ++ श्रेणी सह 2.77 सी. जी. पी. ए. प्राप्त केला आहे. याच महाविद्यालया तुन पास झालेले विद्यार्थी जे धारणी व चिखलदरा तहसील मध्ये रहतात अशे अनेक विद्यार्थी चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहे. कित्तेक विद्यार्थी यांनी P. Hd. पदवी प्राप्त केली आहे. अश्या सर्व माजी विद्यार्थी यांना आव्हान केले की महाविद्यालया च्या विकासात माजी विद्यार्थी यांची भूमिका खुप महत्वाची असते. आपल्याला जसे शक्य असेल तसे आपन महाविद्यालयाला मदत करू शकता व मेल, sms, व्हाट्सअप किंवा कॉल द्वारे महाविद्यालया च्या विकासा करीता आपले विचार, सूचना आम्हाला कळवु शकता. तुम्ही दिलेल्या विचारावर आणि सुचना वर आम्ही नक्की विचार करू अशी ग्वाही देत उपस्थित सर्व माजी विद्यार्थियांचे आभार मानले. माजी मेळाव्याचे आयोजन आभासी पद्धतिने केले गेले ज्या मध्ये 62 विद्यार्थी सहभागी झाले. याचे नियोजन सिपना माजी विद्यार्थी संघटना समितिचे संयोजक प्रा. डॉ. आनंद बक्षी (माजी विद्यार्थी ) यांनी केले व आभार प्रा. रहाटे यांनी केले.
सिपना कॉलेज मध्ये माजी विध्यार्थी मेळावा संपन्न...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
