वीस बेवारस दुचाकी वाहनांचा वरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने लिलाव.


 वरणगाव प्रतिनिधी -सुनिल पाचपोळ.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील पोलीस स्टेशनच्या वतीने आज बेवारस विस दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात आला हा लिलाव 30हजार रुपये मध्ये झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी दिली.2011 पासून वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये सुमारे वीस दुचाकी वाहने बेवावरस अवस्थेत पडून होती ,या वाहनांचा आज कायदेशीर रित्या लिलाव करण्यात आला, या लिलावामध्ये जवळपास 18 लिलाव धारकांनी सहभाग घेतला होता, या वीस वाहनांची शासकीय किंमत 27 हजार ठेवण्यात आली होती, तर ही 20 दुचाकी वाहने तीस हजार रुपयाला लिलावामध्ये विक्री करण्यात आली, असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी दिली आहे.

Previous Post Next Post