वडगाव वाण ते दानापूर रस्त्याचे माजी मंत्री संजय कुटे यांच्याहस्ते भूमिपूजन....


 दानापूर प्रतिनिधी:-सुनिलकुमार धुरडे

अकोला ते बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या व विदर्भाची पंढरी म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज महाराज शेगाव त्याचबरोबर श्रीक्षेत्र काटेल कोलद या मुख्य ठिकाणांना जोडणारा हा  रस्ता मात्र वडगाव वाण ते दानापूर रस्त्याची फार दैनिय अवस्था झाली होती.मात्र जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री संजय कुटे यांच्या प्रयत्नातून आज दिनांक 4 आँगस्ट रोजी वडगाव वाण ते दानापूर 5 किलो मिटर रस्त्यांच्या कामाचे आज आमदार डॉ ,संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.हा उदघाटन कार्यक्रम वडगाव वाण येथे घेण्यात आला. यावेळी मा, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र भाऊ ठाकरे, तेल्हारा पंचयत समिती चे सदस्य संदीप पालीवाल, माजी पंचयत समिती सदस्य ज्ञानदेव घायल, भाजपा बुलढाणा जिल्हा सचिव श्याम आकोटकर, दानापूर चे उपसरपंच सागर ढगे, काटेल कोलद चे सरपंच बाळू तायडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे, भास्कर दांदळे, प्रकाश ढगे, रामराव दांदळे, सुरेश नेरकर , शे, समीर, पत्रकार सुनील कुमार धुरडे, संदीप विखे,  , नंदकिशोर नागपुरे सोगोडा येथिल तंटामुक्त समितीचे श्री, शालिग्राम हागे , संजय हागे, मनोहर कुकडे, शालिग्राम कुरवाडे, विनायक मालोकार, भारत गढे, सुनील लासूरकर , गजानन खिरोडकर, सुरेश अंभोरे, गजानना आमझरे , सुनील धुंदले, देविदास पिंजरकर, रवींद्र राऊत, नामदेव येऊतकर, दानापूर सोगोडा येथील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी आमदार माजी मंत्री संजय कूटे यांचा शाल व श्रीफळ देऊन दानापूर गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Previous Post Next Post