शिस्त व तत्त्वनिष्ठेमुळे यशस्वी जीवन "- अनिल जयस्वाल अध्यक्ष जळगाव शिक्षण मंडळ.उपमुख्याध्यापक वसंतराव पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार...


 जळगाव जा.प्रतिनिधी: -  

शिस्त व तत्त्वनिष्ठा ही शिक्षकांच्या यशाची गुरुकिल्ली असून  आधुनिक काळात आदर्शपिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी ही तत्त्वे अंगीकारावी असे मौल्यवान मार्गदर्शन जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल  यांनी दि. ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त प्राचार्य   वसंतराव पाटील यांच्या   सेवागौरव कार्यक्रमात उपस्थित  शिक्षकांना केले  .   दि न्यू . इरा  हायस्कूल व   कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वसंतराव पाटील हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवागौरव कार्यक्रमाचे आयोजन  महाविद्यालयाच्या   सभागृहात करण्यात आले होते. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल जैस्वाल होते तर सचिव अनुप पुराणिक ,संचालक मिलिंद जोशी, संचालक अभिजीत कुलकर्णी ,  संचालक अॅडव्होकेट शशी गुप्ता, प्राचार्य अविनाश कुलकर्णी  नवनियुक्त उपप्राचार्य शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकारराव तायडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे  पर्यवेक्षक  ओमप्रकाश चांडक आदींची प्रमुख उपस्थिती होती  .सत्कारमूर्ती सेवानिवृत्त उपप्राचार्य वसंतराव पाटील यांचा सहकुटुंब सन्मानपत्र देऊन संस्थेचे अध्यक्ष व संचालकांनी  सत्कार केला. प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी या सेवागौरव कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शाळेतील शिक्षक निळकंठ राठोड, मनोज सराफ  ,गजानन पुंडे ,आशीष सराफ, उमादेवी भट्टड ,सुहास वाघमारे, अनिता बाभूळकर, सुजाता वानखडे   आदींनी  सेवानिवृत्त उपप्राचार्य पाटील यांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला  . संस्थेचे संचालक अभिजीत कुलकर्णी  व सचिव अनुप पुराणिक यांनी    विद्यार्थी दशेतील आठवन व प्रेरक प्रसंग सांगितले  . संस्थेचे सचिव अनुप पुराणिक यांनी या सेवागौरव कार्यक्रमात  संस्थेने  सेवाजेष्ठ शिक्षक शेख सलीम यांची उपमुख्याध्यापक पदी तर सेवाज्येष्ठ शिक्षक ओंकारराव तायडे यांची पर्यवेक्षक पदी संस्थेने नियुक्ती केल्याचे जाहीर केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी  त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या  .सत्कारमूर्ती सेवानिवृत्त उपप्राचार्य वसंतराव पाटील यांनी सेवागौरवसत्कार कार्यक्रमाबद्दल आभार मानले  . जळगाव शिक्षण मंडळाने केलेले सहकार्य व त्यांच्या माध्यमातून झालेल्या शैक्षणिक कार्याला उजाळा देऊन संस्थेचे आभार मानले. तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थी हिताकरिता अविरत कार्य करण्याचे आवाहन केले . कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन  शिक्षक गणेश आसेरकर यांनी केले .

Previous Post Next Post