जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे खांडवी करणवाडी या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न लोकांमध्ये उपस्थित होत आहे. पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसातच रस्त्यावर जागो जाग खड्डे दिसू लागले. हे खड्डे त्वरेने बुजवण्याचे काम संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदार हाती घेण्याऐवजी त्यासाठी विलंब झाला. पावसाचा जोर वाढला आणि छोट्या खड्ड्यांचा आकार वाढला आणि वाढतच गेला त्यामुळे लोकांनी वाहन चालकांनी 'रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता 'अशी शेरेबाजी सुरू केली.पिंपळगाव काळे. खांडवी. करणवाडी. खड्डे बुजवणे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी होय. खड्डे बुजवणे हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. खड्डे बुजवताना माया जमविण्याची कंत्राटदारांची वृत्ती असून ते निकृष्ट कामे करतात. डांबर. सिमेंट.ऐवजी मुरूम.माती. टाकून तात्पुरते खड्डे कसे तरी बुजवतात विविध कारणांनी रस्ते पुन्हा खोदतात नंतर त्यावर माती टाकून खड्डे बुजवल्याचा डांगोरा पिटतात. सर्व कामे उत्कृष्ट व्यवस्थित व वेळेवर झाली तर या भ्रष्टाचाऱ्यांना अधिकाधिक अर्थप्राप्ती कशी होणार कंत्राटदारांची कामे व्यवस्थित नसतील तर त्यांची बिले मंजूर करू नका व यामध्ये कमिशन देणाऱ्यावर व खाणाऱ्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई व शिक्षा करा. कंत्राटदाराच्या निविदा मंजूर करणाऱ्या कार्यालयात लाच लुचपत नको. जेणेकरून रस्त्यांची कामे खात्रीशीर व व्यवस्थित केली जातील माहितीच्या अधिकाराने कोणत्या ठिकाणी किती खर्च झाले याची आकडेवारी प्रसिद्ध होते. पण यातील घोटाळे बहाद्दरांना काहित शिक्षा होत नाही. गेल्या पाच वर्षात खड्डा बुजवण्यासाठीचा संबंधित बांधकाम विभागाचा खर्च काढला तर तेवढ्याच खर्चात एखादा महामार्ग झाला असता. पिंपळगाव काळे खांडवी ते करणवाडी रस्त्यावर खड्डे पडतात जनतेने संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व आमदार.जिल्हा परिषद सदस्य यासाठी वारंवार दूरध्वनी करून या समस्येचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. असे इथल्या सर्व जनतेचे म्हणणे आहे.
पिंपळगाव काळे खांडवी ते करणवाडी रोडवर जागोजागी खड्डे पडले अपघातात मृत्यू झाल्यास जबाबदार कोण?
मंगल काकडे:-पिंपळगाव काळे प्रतिनिधी.
