राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वक्ता प्रशिक्षण विभागाच्या बुलढाणा जिल्हाप्रसिद्धीप्रमुख पदावर रा.बाराळा(बु)येथील श्री.निवृत्ती रामकृष्ण मुडाले यांची नियुक्ती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा.अमोल वानखेडे पाटील यांनी दिनांक 03/08/21 रोजी नियुक्ती पत्रा द्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील साहेब,पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब,वक्ता प्रशिक्षण विभाग प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा सोळुंखे, जिल्हाध्यक्ष आदरणीय नाझेर काझी साहेब,आदरणीय प्रसेनजीत पाटील,आदरणीय संगीतराव भोंगळ, आदरणीय ऍड.संदिप पाटिल उगले यांचे हाथ बळकट करण्यासाठी ही नियुक्ती महत्वपुर्ण ठरणार आहे.यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मधील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटना वाढीस यामुळे निश्चित पक्षाला फायदा होईल असे कार्यकर्ते बोलत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वक्ता प्रशिक्षण विभागाच्या बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवृत्ती मुडाले यांची नियुक्ती...
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.
