राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित घोंगडी बैठकीतुन बहुजनांचे मन मेंदु आणि मनगट सशक्त करण्याचे प्रयत्न-प्रा.अमोलदादा वानखेडे.


बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

महाराष्ट्र संतांची व थोर महापुरुषांची भूमी म्हणुन ओळखली जाते.महामानवांनी जीवाचे रान करून इथल्या प्रत्येक जातीच्या उद्धारासाठी कार्य केले व खितपत पडलेल्या समाजाला ताठ मानेने जगायला शिकवले. जो बहुजन समाज मूठभर मनुवादी लोकांच्या जाचाखाली जगत होता त्याला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचे कार्य महापुरुषांनी केले.जसे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या,बाराबलुतेदार युवकांना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि खऱ्या अर्थाने रयतेला मानाने जगायला शिकवल.छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या राज्यात बहुजनांना आरक्षण देऊन प्रत्येक घटकाला न्याय दिला, क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांचे लेकरं शिकले पाहिजे म्हणुन पुण्यात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना देऊन समता,बंधुता व समाजवाद शिकविला आणि या सर्व महापुरुषांना आदर्श स्थानी ठेऊन आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.साहेबांनी सुद्धा जातीयवाद न करता समाजातील प्रत्येक जातीला सोबत घेऊन 80% समाजकारण व 20% राजकारण हे सुत्र अंगीकारले. आज महाराष्ट्र राज्यात जात पात धर्म यांना फाटा देत सर्वसमावेशक कार्य करणारा बहुजनांचा पक्ष म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे.महापुरुषांचे विचारच आज राज्याला तथा देशाला वाचवू शकतात हे पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही कार्यकर्ते करत आहोत. काल दिनांक 8 ऑगस्ट रोजी बिरसिंगपुर गावी घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब,वक्ता प्रशिक्षण विभाग प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुंखे, जिल्हाध्यक्ष काझी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा तालुक्यात बहुजन विचारांची पेरणी करत असताना बुलढाणा तालुका अध्यक्ष तथा जि. प.सदस्य डी. एस. लहाने सरांच्या कल्पनेतून गेल्या 15 जुलै पासुन "घोंगडी बैठक" प्रत्येक गावागावात पोचली. राष्ट्रवाद मनामनात, राष्ट्रवादी घराघरात हे ब्रीदवाक्य घेऊन येणाऱ्या काळात जर खरा विकास करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणून हक्काच्या लोकांना प्रशासनात बसवावे लागेल असा मानस लहाने सरांचा आहे. या घोंगडी बैठकीत महिला जिल्हाध्यक्ष सौ.अनुजा सावळे पाटील, जिल्हाउपाध्यक्ष मनोजभाऊ दांडगे,पि.एम.जाधव, चिखली तालुका विधानसभा उपाध्यक्ष राजेशजी गवई,सौ. निर्मलताई तायडे, युवानेतृत्व विशालजी फदाट,विद्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष गौरव देशमुख, युवानेतृत्व विशाल सोनुने,युवानेतृत्व मनिष बोरकर,ऍड. गायकवाड,युवानेतृत्व सुनील सोनुने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Previous Post Next Post