आड नदीपात्राच्या डोहात अलमपूर येथील युवकांचा बुडून मृत्यू वारी हनुमान येथील घटना...


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

बुलडाणा अकोला अमरावती या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वान धरणाच्या कुशीत वसलेले वारी हनुमान वारी भैरवगड देवस्थान पर्यटक स्थळ म्हणुन प्रसिद्ध असल्याल्याने व हिरव्यागार परिसर वान नदीचे त्यात आड नदीचे खळखळते पाणी मनाला शांती देऊन जाते येथे नेहमी भाविकांची दर्शनासाठी व पर्यकांची गर्दी खुललेली असते नांदुरा तालुक्यातील अलमपुर येथील वैभव गजानन बढे १९ युवकाला आंघोडीचा मोह आल्याने आडनदी पात्रातील रांजण्या डोहात आंघोडसाठी गेलेल्या वैभव बढे याचा खोल पाण्याचा अंदाज नसल्याने  बुडून मुत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी अंदाजे ५ वाजता दरम्यान  दरम्यान घडली आहे. वारी हनूमान येथील हनूमान मंदीराजवळील आडनदी पात्रातील डोहात नांदूरा तालुक्यातील अलमपूर येथील वैभव बढे हा युवक अंघोळ करण्यासाठी गेला असता डोहात बुडाला. सदर युवक डोहात बुडाल्याचे समजताच सोबतच्या नातेवाईकांनी सोनाळा पोलीसांना सदर घटनेची माहिती दिल्यावरुन सोनाळा पोस्टेचे ललीतकुमार कुंजार तसेच सहकारी सचिन राठोड घटना स्थळी दाखल झाले व परिसरातील पटटयाचे पोहनारे राजेन्द्र पाले यांच्या सहकार्याने रात्री ११ वाजता बुडालेल्या वैभव बढे चा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात श्वविच्छेदन केल्यानंतर युवकाचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  सोनाळा पोलीस स्टेशनला अकास्मित मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार गुटटे यांच्या मार्गदर्शनात ए एस आय ललीतकुमार कुंजार हे करित आहे.

Previous Post Next Post