धारणी पासून जवळच धारणी अकोट रोडवरील सावऱ्या येथील महादेव शनवारे यांनी घराजवळच्या खाली जागेत तुळसीबाग फुलवली आहे. ज्यामुळे चोवीस तास ऑक्सिजन मिळत आहे.जणू त्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे.तुळसी ही वनस्पती अतिशय उपयोगी असल्याने आयुर्वेद मध्ये तुळसीला अमृत मानले जाते. तुळसी एकमेव वनस्पती आहे जि चोवीसतास प्राणवायू देते. त्याअनुषंगाने महादेव शनवारे यांनी सावऱ्या येथे त्यांच्या घराच्या अंगणालगत खाली जागेत तुलसी चे लहांन लहान रोपटे लावले आज त मोठी बाग झाली. सर्व गावकरी विविध धार्मिक विधी,पूजेसाठी व आजारासाठी औषधी म्हणून तुलसी ची पाने फुले नेतात.भारतीय संस्कृती मध्ये तुळशी ला देवाचे स्वरूप मानले जाते प्रत्येक घराच्या दारीं, अंगणी तुळशी चे वृंदावन लावले जाते. यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन असा कि तुळशी ही चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने घरात ऑक्सिजन ची कमतरता भासू नये घरातील महिला व बाल्काना पुरेसा ऑक्सिजन मिळावा.कोरोना काळामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली असताना दररोज तुळशी चा रस घेऊन, सकाळ संध्याकाळी तुळशी बागेत बसून ऑक्सिजन ची पातळी वाढवली व त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोनाच्या काळात संपूर्ण गावामध्ये ह्या बागेतील तुळसी बहूउपयोगी ठरली आहे. तुळसीचा काढा तुळसीचा रस त्यावेळी रुग्णांना दिल्यावर त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम केले.
महादेव शनवारे यांनी तुलसी बागेच्या माध्यमातून साकारले ऑक्सिजन प्लांट..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.