हिवरखेड ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायती मध्ये होण्याबाबत शहरात चर्चेला चांगलेच उधाण आले असून पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन खिरोडकर यांच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्याने या चर्चेत आणखीही भर पडली आहे त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी याची निश्चितच दखल घेतील असे बोलले जात आहे.हिवरखेड नगरपंचायतीचा लढा मागील वीस वर्षांपासून लोकोप्रतिनिधी ,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सुरू आहे .सन २००० , २००१ मध्ये प्रथम महिला सरपंच सौ इंदिराताई इंगळे व त्याच्या सहकारी सदस्यांनी पहिला नगरपंचायतीचा ठराव घेऊन शासन दरबारी दाखल केला होता तेव्हापासूनच विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव यांनी वारंवार नगरपंचायतीची मागणी शासनाकडे केली आहे. हिवरखेड हे चाळीस हजार लोकसंखेच्या वरील शहर असून नगरपंचायत होण्याच्या निकशातही परिपूर्ण आहे. सध्यापरिस्थितीत नगरपंचायतीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी अकोला यांच्या माध्यमातून मंत्रालयात पोहचला असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे अहवालातील त्रुट्याचीही पूर्तता करण्यात आली आहे. आणि शासनाकडून नुकत्याच काही ग्रामपंचायती नगरपंचायत म्हणून घोषितही करण्यात आल्यामुळे हिवरखेड नगरपंचातीची घोषणा कोणत्याही क्षणी शासनाला करता येते मग शासन का घोषणा करत नाही? . त्यातच नुकंत्याच वारकरी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी हिवरखेड नगरपंचायत होईपर्यंत स्वस्त बसणार नसल्याचे जाहीररीत्या विश्वासन दिले आहे यासर्व बाबींमुळे हिवरखेड नगरपंचायत होण्याबाबत शहरात तर्क वितर्कांना पेव फुटले आहे. त्यातच हिवरखेड नगरपंचायत करण्याबाबत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष अर्जुन खिरोडकार यांनी नगरपंचायतिची घोषणा न झाल्यास येत्या स्वतंत्रदिन १५ ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा ईशारा शासनाला दिला आहे.हिवरखेड नगरपंचायत करण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी देखील लक्ष देऊन तात्काळ नगरपंचायतीची घोषणा करणे बाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी देखील नागरिकांकडून होत होत आहे.या सर्व बाबींमुळे माञ काही स्थानिक लोकप्रतिनिधींना धुळकी भरली आहे हे मात्र निश्चित..!
हिवरखेड नगरपंचायतिची घोषणा..!पत्रकार संघाच्या वतीने आमरण उपोषणाचा ईशारा.हिवरखेडात तर्क वितर्कांनां फुटले पेव...
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
