धारणी येथे उपविभागीय कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली नवसंजीवनी योजनेचा आढावा सभा सपन्न झाली.जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा विभागनिहाय योजनेचा आढावा घेतला.मेळघाट मधिल आदिवासीच्या जीवनाशी निगडीत विविध शासकीय विभागाद्वारे विविध योजना राबविल्या जात असल्याने त्या सर्व योजणांची एकत्र सांगड घालून त्या सर्व योजना मिळून नवसंजीवनी योजना यासाठी जिल्हास्तरावर नवसंजीवनी समिती शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे.दर महिन्याला या योजनेची आढावा सभा होणे अपेक्षित आहे परंतु कधीच दर महिन्याला ही सभा होत नाही.सर्वप्रथम जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे आढावा घेण्यात आला. त्यामध्ये पावसाळ्यात बंद होणाऱ्या मार्गाची माहिती व त्यासाठी केलेली उपाययोजना याबत माहिती उपाभियंता श्री ठाकरे यांनी दिली त्यानंतर आरोग्य,पाणीपुरवठा,धान्पुरवठा, रॊ. ह.यो.बालविकास इत्यादी सर्व विभागाचा धावता आढावा .
जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांचा धारणी चा पाहिलं धावता दौरा.धारणीत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नवसंजीवनी आढावा सभा सपन्न..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
