पिंपळगाव काळे येथे संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न...


मंगल काकडे:- पिंपळगाव काळे. प्रतिनिधी.

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना ६७१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त महाराणा प्रताप सभागृहात रोज सकाळी श्री वसंता अंबरडे महाराज हे प्रवचन वाचून सर्वांना सांगत असे दिनांक ६ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान भजनी मंडळी तर्फे संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी पर अभंगाचे गायन आरती करून व संत शिरोमणी नामदेव महाराज की जय 'चा जयघोष करण्यात आला. व महाप्रसाद वाटप झाला. त्यानंतर गावातून टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे भाविकांनी ठीकठिकाणी स्वागत करीत पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्या होत्या व शेवटी पालखीची सांगता करण्यात आली. यावेळी.प्रफुल गोडाळे. सुबह चिंचोलकर. दिनेश चिंचोलकर. रविंद्र चिंचोलकर. अक्षय पांडे. रुपेश जाधव. प्रशांत जाधव. उदय सुरळकार. सतीश हुरपडे. संतोष राजूरकर. व सर्व समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post