बुलढाणा जिल्ह्यातील दुचाकी चोरीवर आळा घालण्याकरीता तसेच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात करिता बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बळीराम गिते यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी स्थानिक गुन्हे शाखेची पथके नेमली होती. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ग्राम वसाडी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा येथील सुनिल भावसिंग मुझाल्दा व राकेश गुलसिंग जमरा हे दोघेही चोरीच्या मोटरसायकल चोरून कमी किमतीत विक्री करत आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली असता सुनील भावसिंग मुजाल्दा व राकेश गुलसिंग जमरा या दोघांना पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून विचारपूस केली असता सुनील मुजाल्दा व राकेश गुलसिंग जमरा हे दोघेही मध्यप्रदेशातील मुख्य दोन आरोपीच्या मदतीने मोटरसायकल चोरून ते कमिशनवर ग्राम वसाडी,निमखेडी,टुनकी व सोनाळा येथील काही इसमांना विक्री करीत होते असे तपासात निष्पन्न झाल्यामुळे 21 मोटरसायकली व एक ट्रॅक्टर हे सुनील मुजाल्दा यांच्याकडून जप्त करून पोलीस ठाणे सोनाळा येथे जमा करण्यात आले असून सदरच्या संशयित मोटरसायकली व ट्रॅक्टर बाबत अभिलेखाची पाहणी केली असता यामध्ये बीड, नंदुरबार,मध्यप्रदेश,गुजरात राज्यात सदर मोटरसायकल ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. 21 मोटरसायकली पैकी 6 मोटरसायकली बाबत अद्याप माहिती अप्राप्त असल्याने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून अधिक ची माहिती घेण्याची प्रक्रिया स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सुरू आहे सदरच्या कारवाई दरम्यान सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुंठ्ठे व त्यांच्या कर्मचार्यांनी गुन्हे शाखा बुलढाणा पथकास सहकार्य केले आहे.तसेच सुनील मुझाल्दा व राकेश जमरा यांनी पोलीस ठाणे धाड हद्दीतील मोटरसायकल चोरीचे निष्पन्न झाल्याने सध्या आरोपींना पोलीस स्टेशन ठाणे येथे अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार युवराज मुळे पोलीस स्टेशन ठाणे हे करीत आहेत. गुन्ह्यात अटक करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्ह्यातील/ राज्यातील पोलिसांमार्फत सुरू आहे सदर आरोपी जवळून जप्त केलेला मुद्देमाल 21 मोटरसायकली व एक ट्रॅक्टर किंमत अंदाजे सोळा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वसाडी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा येथे करण्यात आली सदर आरोपी वर कारवाई करण्यासाठी ची यशस्वी कामगिरी अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा हेमराज सिंग राजपूत पोलीस अधीक्षक खामगाव बजरंग बनसोडे अप्पर पोलिस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार,पोलीस उपनिरीक्षक संजय नागवे,दिनेश बकाल,गणेश पाटील,गजानन गोरले,सुरेश भिसे व सचिन जाधव तसेच या कारवाईमध्ये सायबर सेलचे राजू आढवे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.या कारवाई दरम्यान पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्यातर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात आले आहे की कोणताही इसम विना कागदपत्राची मोटरसायकल चार चाकी वाहन मोबाईल घेत असेल किंवा विक्री करत असेल याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील दूरध्वनी क्रमांक 07262-242738 या क्रमांकावर संपर्क साधावा सदर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गुपित ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.
मोटार सायकल चोरीची आंतरराज्यीय टोळी केली स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद आरोपीकडून 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.