गिरगुटी येथील युवकाचा आंध्र प्रदेशात मृत्यू...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

कामाच्या शोधात आंध्रप्रदेशात गेलेल्या युवकाचा सोमवारी रात्री रस्त्याने जात असताना अपघाती मृत्यू झाला,लखन मोतीराम मावस्‍कर २७ गिरगुटी असे मृत युवकाचे नाव आहे.त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वीस दिवसापूर्वी चिखलदरा तालुक्यातील गिरगुटी,धरमडोह परिसरातील जवळपास तीस आदिवासी युवक आंध्र प्रदेशच्या पीरूनाला येथे सुर्या सेम या चुना बनविण्याच्या फॅक्टरीत कामाला गेले होते. सोमवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान  मृतक लखन मावस्कर रस्ता ओलांडत असताना कारच्या धडकेत रस्त्याच्याकडेला फेकला गेला तेथे त्याचा मृत्यू झाला तर शालिग्राम नामक सहकारी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे यासंदर्भात त्याचे सहकारी उमेश भुसुम सुरज दारसिंबे ,संजय बेलसरे,शालिकराम मावस्कर लखन त्याचे शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह घेऊन परत निघाले असल्याचे त्यांनी  दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.यापूर्वी काही दिवसापूर्वी धोद्रा येथील युवकाला डांबून मारल्याची चर्चा होती. मेळघाट मधून कामाच्या शोधात गेलेल्या युबकांसोबत बऱ्याच अश्या घटना झाल्या असल्याने, मेळघाट मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post Next Post