साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम जळगांव जामोद च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे गऊळ या गावात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा खाजगी जागेत बसविला होता आणि तो पुतळा काढण्यात आला होता या नंतर तणाव निर्मान झाला याचाच राग म्हणून सत्तेचा माज चढलेल्या जिल्हा परिषद सदस्य गिर्हे यांनी गावातील मातंग समाज बांधवांना घरात घुसुन बेदम मारहाण करण्यात आली व डि वाय एस पी यांनी आरोपींना पाठिशी घातले त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी केली आहे तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशा पध्दतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी फोरमचे जिल्हा अध्यक्ष वामण गुळेकर, गजानन मस्के तालुका अध्यक्ष,संदिपपान सोनोने,कैलास डाखोरे, एकनाथ तायडे ,पवण अवचार सह इतर अनेक कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ अण्णाभाऊ साठे फोरमच्या वतीने देण्यात आले निवेदन..
जळगांव जामोद प्रतिनिधी:-