नांदुरा तालुक्यातील विविध ठिकाणी अवैधरित्या विक्रीसाठी जाणारी 35 हजाराची देशी दारू जप्त करून या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी ओमनी व्हँन सह दोघांना अटक केली. ही कारवाई आज दुपारी 3 वाजता मामुलवाडी ते अलमपुर रोडवरील पलसोडा फाट्यावर केली. विजय निव्रुत्ती शिंदे वय 30 रा.शिवाजी नगर , मलकापूर ,व योगेश लक्ष्मण बघे रा.रणगाव ता.मलकापूर अशी आरोपींची नावे आहेत.या बाबत प्राप्त माहीतीनुसार , मलकापूर येथील देशी दारुचा विक्रेता नांदुरा तालुक्यातील विविध गावात देशी दारुची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती नांदुरा पोलीसांना मिळाली होती.या माहिती नंतर जी.पो.अ.अरविंद चावरीया, डीवायएसपी त्यागी व नांदुरा ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे गजानन जायभाय, विनायक मानकर ,सलीम बरडे व ससाणे अशा चौघांनी आज दुपारी तीन वाजता मामुलवाडी ते अलमपुर रोडवर नाकाबंदी केली. यावेळी मारोती ओमनी कार क्र.एम . एच 28 एई 5300 या मधून देशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती या पथकाला मिळाल्या नंतर पोलिसांनी सदर गाडी येताच ती थांबवून तीची झडती घेतली असता त्या गाडीत संत्रा , टँगो पंच या कंपनीची बारा बाँक्स देशी दारु किंमत 35 हजार रूपये आढळुन आल्यानंतर पोलिसांनी देशी दारुचा हा साठा व ओमनी कार असा 80 हजाराचा मुद्दे माल आरोपी विजय शिंदे व योगेश बघे यांचे ताब्यातुन जप्त करून त्यांच्या विरूद्ध 65(अ)(ई) मुं.दा.का.सह कलम 130/177 मो.वा.का.अन्वये दाखल करुन आरोपींना अटक केली. पुढील तपास गजानन जायभाय हे करीत आहेत.
ग्रामीण भागात अवैधरित्या विक्रीसाठी जाणारी 35 हजाराची देशी दारू जप्त. दोघांना अटक...
नांदुरा ता. प्रतिनिधी:-
