डफरीन रूग्णालयातील अस्वच्छतेचा प्रहारने केला पर्दाफाश,पुण्याच्या आरोग्य संचालकांसमोर प्रकार उघड, सीएसची केली कानउघाडणी...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

पुण्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील व आरोग्य उपासंचालक डॉ. चव्हाण यांनी बुधवारी जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. येथील कंत्राटी कामगारांचे काही महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा मुद्या घेऊन प्रहारचेही पदाधिकारी त्याठिकाणी धडकेले. त्यांनी या मुद्यासह डफरीन व रूग्णालयातील अस्वच्छेतेचा आरोग्य संचालकांसमोर पर्दाफाश केला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक व महापालिका आयुक्‍तांना बोलावून त्यांची साफसफाईबाबत कानउघाडणी करण्यात आली.बुधवारी दुपारी पुण्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील व अकोल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. चव्हाण यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयाला (डफरीन) भेट दिली. यावेळी जिल्हा स्त्री रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयात कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे सात महिन्यापासून वेतन मिळाले नाही. यामागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू वसू महाराज, शहराध्यक्ष बंटी रामटेके, जिल्हा कामगार अध्यक्ष गौरव ठाकरे यांच्या नेतृत्वात आरोग्य संचालक व उपसंचालकांना घेराव घालण्यात आला. यावेळी कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे वेतन तातडीने अदा करण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले. यावेळी प्रहारच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा स्त्री रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयालयातील अस्वच्छता दाखवून दिली. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी कशी घाण पसरलेली आहे, हे दाखवून दिले. रूग्णालयात बरे होण्यासाठी आणलेल्या रूग्णांव्यतिरिक्‍त त्यांचे नातेवाईकच आजारी पडत असल्याची बाब यावेळी अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली.यावेळी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील व उसंचालक डॉ. चव्हाण यांनी जिल्हा शल्य शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांची कानउघाडणी केली. तसेच स्वच्छतेची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाकडे असल्याचे डॉ. निकम यांनी सांगताच महापालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनाही याबाबत जाब विचारण्यात आला. तातडीने ही अस्वच्छता साफ करण्याचे आश्‍वासन प्रशांत रोडे यांनी दिले. या आंदोलनात प्रहारचे मधुकर भुले, मनोज जावरकर, पूनम आसलकर, रत्ना सवाई, मो. समिर, भारती पडोळे, जय हिवरकर, संजय भगत आदींचा समावेश होता.

Previous Post Next Post