उपेन बछले यांचा राज्यपाल महाराष्ट्र राज्य व समाजकल्याण मंत्री भारत सरकार यांचा हस्ते लोकसेवा गौरव पुरस्कार देऊन केला सन्मान..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

 राज भवन मुंबई येथे  महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंग कोशारी साहेब, तसेच माननीय केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब, तसेच युनायटेड बुद्धिस्ट अंड आंबेडकराईट फाउंडेशन चे अध्यक्ष प्रदीप जगताप साहेब यांचा द्वारे आयोजित , सोबत अखिल भारतीय बलई महासभा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबुलालजी बछेर साहेब आमदार जयपुर राजस्थान, व ताराचंद बुनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपेन चंदनजी बछले युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र तसेच विभागीय संपर्कप्रमुख युवा स्वाभिमान पार्टी यांचा राज्यपालांच्या हस्ते लोकसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.उपेन बछले यांनी आदिवासी क्षेत्रा मध्ये गोरगरिबांन करिता तसेच युवा करिता व समाज हिताकरिता केलेल्या अभूतपूर्व कामाबद्दल व योगदानाबद्दल राज्यपाल यांनी दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.उपेन बछले यांनी उचललेल्या सामाजिक कर्तव्याचा वसा,  याची प्रेरणा प्रत्येक युवकांनी घ्यावा, असं राज्यपाल यांनी म्हटले.राज्यपालांनी दिलेल्या पुरस्काराबद्दल उपेन बछले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Previous Post Next Post