शिक्षक आपल्याला भरभरुन देतात कितीतरी प्रकट - अप्रकट भुमिकांमधुन जसे की , ज्ञानप्रसारक , प्रशिक्षक , कौशल्यदाता , संस्कारदाता , समुपदेशक , प्रबोधक , मार्गदर्शक , मित्र , आधारस्तंभ , !!समाज उन्नतीसाठी कार्यरत राहुन युवापिढीतुन ज्ञानधिष्ठित , सकारात्मक , व सृजनशील समाज घडवुन देशाच्या सर्वांगिण विकासात बहुमोल योगदान देणार्या सर्व गुरुस दंडवत प्रणाम !! सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला या सत्काराने सर्व शिक्षक भारावून गेले सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांच्या कार्यामुळे सर्वत्र स्तुती होत आहे आज पर्यंत शिक्षकांचे सामुहिक सत्कार मोठ्या प्रमाणात झाले परंतु घरी जाऊन सत्कार करणे हा आगळावेगळा कार्यक्रम पहिल्यांदा होत असल्यामुळे ही कौतुकाची थाप महेश सोनवणे यांच्यावर पडत आहे
आपले गुरु , शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा 5 सप्टेंबर हा दिवस...
वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
