ऐन्टी करप्शन ब्युरो, अमरावती चमुने दिनांक ०९.०९.२०२१ रोजी १) संजय उत्तमराव केवट, वय ४६ वर्षे पद, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अमरावती व २) प्रशांत बाबुराव सांगोले, रा देविनगर, वडाळी, अमरावती, खाजगी इसम या दोघांना ०९.०९.२०२१ चे १३.४५ ते १४.०५ वा दरम्यान ४०,०००/- रुपयांची लाच घेतांना रंगे हाथ पकड़ले. रेल्वे स्टेशन अमरावती ते बस डेपो अमरावती रोडवरील मलकापूर अर्बन बँकेसमोर, ही लाचेची रक्कम घेण्यासाठी आलेले संजय केवट व त्यांच्या साथीदाराला एल सी भी च्या टीमने अटक केले.थोडक्यात हकिकत : यातील तक्रारदार हे त्याचे वडीलांचे नावे परवाना असलेले बार रेस्टॉरंट चालवित असून राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावती येथील अधिकारी श्री. केवट, व कर्मचारी प्रशांत यांनी तक्रारदार याना तुमचेकडून आम्हाला ५०,०००/- रुपये पाहिजेत अन्यथा आम्ही तुमचे स्टॉक रजिस्टर व गोडावूनमध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे दाखवून तुमचेविरुध्द कारवाई करू असे म्हणून तक्रारदार यांचे बार रेस्टॉरंटवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करणेकरीता ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत दिनांक १६.०८.२०२० रोजी तकार प्राप्त झाली.सदर तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावती येथील अधिकारी श्री.केवट, व कर्मचारी प्रशांत यांनी तकारदार यांना त्यांचे रेस्टॉरंटवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करणेकरीता तडजोडीअंती ४०,०००/- रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दिनांक ०९.०९.२०२१ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे संजय केवट, दुयम निरीक्षक यांचेकरीता श्री प्रशांत सांगोले यांनी तक्रारदार यांचेकडून ४०,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नमुद आरोपीविरुध्द पो स्टे सिटी कोतवाली, अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.सदरची कार्यवाही मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो,अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. अरुण सांवत, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो,अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री.संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक, श्री.एस.एस. भगत, पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पो.नि. संतोष इंगळे, पो.नि. सतीष उमरे, पो ना. सुनिल व-हाडे, युवराज राठोड, महेंद्र साखरे, पो.कॉ. अभय वाघ, तुषार देशमुख, निलेश महिंगे, चालक स.पो.उ.नि.सतिष किटकूले, पो ना चंद्रकांत जनबंधु, पोका उपेंद्र थोरात यांनी पार पाडली.नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारा संबंधी तकार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
निरीक्षक संजय केवट ने केली होती 50 हजारांची मागणी, 40 हजार घेतांना अटक...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
